सूक्ष्म कंटेंमेन्ट झोन सोडल्यास इतर सर्व ठिकाणी अनलॉक…..

4

राजगुरूनगर, दि.२५ जुलै २०२० : खेड तालुक्यात २४ जुलै पर्यंत ३ नगरपरिषद आणि १८ गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आली होती. मात्र आता ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आलेत त्या ठिकाणी सूक्ष्म कंटेंमेन्ट झोन करून इतर सर्व ठिकाणच्या अस्थापना सुरु करण्याचे निर्देश प्रभारी प्रातांधिकारी सुनील गाडे यांनी दिले आहेत .
 
संजय तेली यांचा करोना अहवाल पाँझिटिव्ह आल्याने प्रांत कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह तहसीलदार सुचित्रा आमले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे,गटविकास अधिकारी अजय जोशी आदि होम क्वारांटाईन होऊन घरात राहुन प्रशासकीय यत्रंणेशी समन्वय ठेऊन कामकाज पहात आहेत. तर पहिल्यांदाच कोरोनाच्या गर्तेत सापडलेले राजगुरूनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी हे बरे होऊन परतल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी घरी आल्यावर फुले टाकुन त्यांचे स्वागत केले तर पोलिस ठाण्यातील बहुतेक सर्वच कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गेले आठवडाभर संपुर्ण पोलिस ठाणेच संशयाच्या भोव-यातुन सुटल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 खेड तालुक्यात गेल्या १३ जुलै पासुन लॉकडाऊन काळात रुग्णांच्या संख्येचा दिवसेंदिवस आलेख वाढत असताना २८ जुलैपर्यत लाँकडाऊनचा निर्णय प्रशासनाने परीपत्रक काढले असताना,लोकप्रतिनिधी आणि शहरातील व्यापा-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याने प्रशासनाला अखेर निर्णय बदलावा लागला. तालुक्यातील १८ गावांसह, ज्या गावांत कोरोना रुग्ण सापडले आहे ,तसेच नगरपरीषदेच्या हद्दीतील जाहिर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन इतर भागात कंटेन्मेंट झोन नसला तरी नागरीकांनी आणि सर्व आस्थापना धारकांनी शासन नियमांनुसारच दिलेल्या वेळा पाळुन सर्व नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र नियम भंग करणा-यांवर पोलिस यत्रंणेसह नगरपरीषद कर्मचारी सतत लक्ष ठेवणार आहेत. तसेच नागरीकांनीही कोठेही अनावश्यक गर्दी न करता कामकाज करुन आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रातांधिकारी सुनिल गाडे यांनी केले आहे.

 तालुक्यातील राजगुरूनगर नगरपरिषद हद्दीत २२,आळंदी हद्दीत ३५ तर चाकण हद्दीत ६४ कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे तर ग्रामीण भागात ७०  गावांत कंटेन्मेंट झोन आहेत. तालुक्यात मेदनकरवाडी येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरीकांचा वायसीएम मध्ये उपचार सुरु असताना बळी गेल्याने तालुक्यात बळींची संख्या १७ वर पोहचली. आज अखेर ९३२ एकुण रुग्ण संख्या पोहचली. पैकी ४८२ रुग्ण बरे झाले सध्या ४३३ रुग्ण उपचार घेत आहे. राजगुरूनगर ,आळंदी आणि चाकण नगरपरीषद हद्दीत अनुक्रमे २,६,८ रुग्ण वाढले.केळगाव ३, च-होली खु. २, खराबवाडी २,चिबंळी ३, निघोजे ८,मेदनकरवाडी ५,नाणेकरवाडी ५, म्हाळुंगे २,वाडा २, आणि बहुळ,भोसे,कडुस,दावडी,किवळे, होलेवाडी येथे प्रत्येक गावात एक रुग्णांचा अहवाल पाँझिटिव्ह आल्याने ३८ वर रुग्णांची भर पडली.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुनिल थिगळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा