कलाछंद ड्रॉइंग क्लास ची विद्यार्थीनी उन्नती पाटील चे चित्र थेट मध्यप्रदेशातील राष्ट्रीय चित्र प्रदर्शनात

पाचोरा जिल्हा येथील कला छंद ड्रॉइंग क्लास ची विद्यार्थिनी उन्नती नितीन पाटील हिच्या ‘ प्रेम प्रसंग ‘ या शिर्षकाखालील चित्राची निवड राष्ट्रीय कालिदास चित्र- मूर्तिकला उज्जैन मध्य प्रदेश येथील राष्ट्रीय प्रदर्शनात नुकतीच झाली होती. देशभरातून केवळ ८० चित्रकारांच्या कलाकृतींची निवड या प्रदर्शनात झाली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून केवळ ४ दिग्गज कलाकारांचा समावेश यात होता, त्यात अवघ्या उन्नतीची इयत्ता १२ वी च्या विद्यार्थिनीची निवड झाली होती. हे चित्र तिने ऐक्रेलिक माध्यमात केले असून मालकविकाग्नी या प्रेयसीची कथा उन्नतीने मुघल व राजस्थानी शैलीतून अतिशय उत्कृष्ट पणे मांडली होती. उन्नतीच्या या यशामुळे संपूर्ण खानदेशातून तिचे कौतुक केले जात आहे. पाचोरा तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. यापूर्वी देखील तिच्या चित्रांची निवड राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर झाली असून तिला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिला निर्मल इंटरनेशनल स्कूल पाचोरा येथील कलाशिक्षक तसेच नामांकित रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . ती निर्मल इंटरनेशनल स्कूल पाचोरा येथील माजी विद्यार्थिनी असून गजानन डेरी पाचोरा येथील संचालक आबाजी तुकाराम पाटील अंतुर्ली पाचोरा यांची नात व नितीन दादाजी पाटील यांची कन्या होय. संपूर्ण पाचोरा शहरातून उन्नतीचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: आत्माराम पाटील