‘मला वाचवा, मला मारायचं नाही, मला त्यांना लटकलेले पाहायचे आहे’ हे शेवटचे शब्द होते उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील २३ वर्षीय युवतीचे… गुरुवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी पेट्रोल टाकून या युवतीला अतिशय नीचतेने गुन्हेगारांनी जिवंत जाळले होते. त्यानंतर ६५ तासांनी बलात्कार पीडितेचा मृतदेह जेव्हा तिच्या घरी पोहोचला तेव्हा संपूर्ण गाव हळहळले होते. तिने सुमारे ४३ तास आयुष्यासाठी संघर्ष केला, परंतु शुक्रवारी रात्री ११.४० वाजता ती देत असलेल्या झुंजीत अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला.
गुरुवारी पहाटे चार वाजता उन्नाव बलात्कार प्रकरणातील सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जाण्यासाठी गेली होती. उन्नावच्या बैसवारा बिहार रेल्वे स्थानकातून ती ट्रेन पकडणार होती. त्याच वेळी तिच्यावर नराधमांनी हल्ला केला आणि तिला पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि तिला मारण्यासाठी तळमळत सोडून दिलं.
हे सर्व असूनही ती एक किलोमीटर पर्यंत पळत गेली जिथे तिला एका घरा बाहेर एक व्यक्ती काम करताना दिसला. पिडीतेने त्याकडे मदतीची हाक मारली आणि स्वतः पोलिसांना फोन करून झालेला प्रकार सांगितला. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथून तिला लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात केले. प्लास्टिक सर्जरी बर्न युनिटमध्ये दाखल झाल्यानंतर पीडितेचे वक्तव्य नोंदविण्यात आले. आपल्या निवेदनात तिने पाचही आरोपींची नावे सांगितली.
देशातील हळू गतीने चालणारी न्यायव्यवस्था आणि वाढते बलात्काराचे प्रमाण या सर्वात अजाची तरुणी भयभीत आहे. बलात्कार होऊन ही जर आरोपींना शिक्षा होण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असेल तर न्याय व्यवस्थेवर हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. कठोर तरतुदी हव्यात अशी जनतेची मागणी आहे तर एका बाजूला मानव अधिकार वाले याचा विरोध करत आहे.