उन्नाव बलात्कारप्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी(दि.६)रोजी रात्री तिने दिल्लीतील सफरदगंज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी(दि.५)रोजी रात्री तिला ९० टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

गुरुवारी या पीडित तरुणीला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ९० टक्के भाजली होती.त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली होती. धक्कादायक म्हणजे जामिनावर सुटलेल्या पाच नराधम आरोपींनीच पीडितेला जाळले होते. पीडितेच्या जखमा अत्यंत गंभीर होत्या आणि तिला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न डॉक्टरांनी केले.

शुक्रवारी तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. मात्र रात्री ११.१० वाजता तिला कार्डी एक ऍटक आला. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र १०.४०वाजता तिची प्राणज्योत मालवली.

भररस्त्यात जाळले

उन्नाव गावातील या पीडित तरुणीच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेली येथे रेल्वेने जाण्यासाठी पीडित तरुणी घराबाहेर पडली. घरापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या पाच आरोपींनी तिला अडवले आणि अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. जीव वाचविण्यासाठी पीडित तरुणी सैरभैर पळत होती. गावकऱ्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोलीस आले आणि पीडितेला रायबरेलीतील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले होते

या प्रकरणी पोलिसांनी पाच नराधम आरोपी हरिशंकर त्रिवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश वाजपेयी, शिवम् त्रिवेदी आणि शुभम् त्रिवेदी यांना अटक केली आहे. पीडितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हे नराधम आधी अटकेत होते. नोव्हेंबरमध्ये त्यांना जामीन मिळाला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा