पुरंदर ,१४ ऑक्टोबर २०२० :स्थानीक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षणाचे जनक असलेल्या माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या नावाने सुरू असलेल्या कर्नलवाडी येथील शरद-विजय विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पुष्पा ज्ञानदेव निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुरंदरच्या सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच विविध किकास सोसायटीच्या चेअरमनपदाची महिलेला संधी मिळाली आहे.
कर्नलवाडी (ता.पुरंदर) येथील शरद-विजय विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निरा येथील मुख्य कार्यालयात चेअरमन पदाची निवडणूक पारपडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड, अनिल उरवणे यांनी काम पाहिले. त्यांना संस्थेचे सचिव गंगाराम कादबाने व सहायक निखिल निगडे यांनी सहकार्य केले. यावेळ सोसायटीचे व्हाइस चेअरमन शिवाजी निगडे, संचालक नंदकुमार निगडे, नामदेव नेवसे, दादा रासकर, बाळक्रुष्ण निगडे, भानुदास पाटोळे, जानकाबाई वाघापुरे, विठ्ठल कर्णवर, नितीन कर्णवर, अरविंद निगडे, रामदास निगडे, अशोक निगडे उपस्थित होते. माजी चेअरमन अशोक निगडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली. पुष्पा निगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शरद विजय विविध विकास सेवा सहकारी सोसायटीच्या नीरा येथील सभागृहात पुष्पा निगडे यांच्या निवडी नंतर सत्कार समारंभ घेण्यात आला. कोरोनाचे नियमपाळात सत्कार समारंभ झाला. यावेळी शिवस्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन पृथ्विराज निगडे, संचालक भरत निगडे, माजी सरपंच लक्षमण वाघापुरे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सोसायटीचे व ज्युबिलंट कामगार युनियनचे संचालक नंदकुमार निगडे यांनी आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- राहुल शिंदे.