गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे लोणीकाळभोर उपसरपंचपदी राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड

लोणीकाळभोर उपसरपंचपदी राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड

लोणी काळभोर,दि.३ जून २०२० : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजाराम विठ्ठल काळभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार यांनी दिली.

गावचे उपसरपंच राजेंद्र काळभोर यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी आज (बुधवारी) ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी गायकवाड होत्या. तर सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी डी के पवार यांनी काम पाहिले.

या बैठकीला माजी उपसरपंच योगेश काळभोर, आण्णासाहेब काळभोर सह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंच पदासाठी केवळ राजाराम काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच आश्विनी गायकवाड यांनी जाहीर केले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हवेली तालुक्याचे जेष्ठ नेते माधवराव काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, शिवदास काळभोर, मनिष काळभोर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version