ओरोस पट्ट्यात अवकाळी पाऊस!

बागायतदारवर्ग धास्तावला; येणाऱ्या आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता

ओरस (जि. सिंधुदुर्ग), २६ नोव्हेंबर २०२२ : अवकाळी पावसानं पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत काल दुपारी अडीचच्या सुमारास हजेरी लावली. कुडाळ तालुक्याच्या काही भागांत आज दुपारी पाऊस पडलाय. मध्यम स्वरूपाचा हा जरी पाऊस पडला असला, तरी यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारवर्ग मात्र धास्तावलाय. मागील काही दिवस कोकणात थंडी बऱ्यापैकी पडली होती; परंतु काल अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. ओरोस, कसाल, पणदूर, हुमरमला, डिगस सहयाद्रीच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मागील १५ दिवसांत चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजू पीक चांगलं येण्याची शक्यता होती; पण या अवकाळी पावसाने आंबा, काजू मोहोराला फटका बसण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रोहन नाईक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा