अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्याचे हाल केले बेहाल

अकोला ३१ मे २०२३ : अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार २६ व २७ एप्रिल रोजी पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील ३४४ गावांतील ५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावरील अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.

या नुकसानीबाबत कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांचे सुमारे १० कोटी २६ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मागणारा प्रस्ताव नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. मार्च महिन्यात ६, ७ ते ९ मार्च आणि १५ ते १९ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबाग व रब्बी पिकांचे नुकसान झाले.

पातूर तहसीलमध्ये सर्वाधिक नुकसान…
जिल्ह्यातील पातूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ४,०३९.०५ एवढ्या क्षेत्रात नुकसानी झाली तर जिल्ह्यात ६,७४२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बार्शीटाकळी तालुक्यात १,०८४.०६ एवढ्या क्षेत्रात नुकसानी झाली. मूर्तिजापूर तालुक्‍यातील ४५.८५ हेक्‍टर क्षेत्रावरील २,३३५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अकोट तहसीलमध्ये ३५४.७७ क्षेत्रात नुकसानी झाली तर परिसरातील ५९५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले, बाळापूर तहसीलमध्ये ३६१.३३ क्षेत्रात नुकसानी झाली तर जिल्ह्यात १.३९५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, अशा प्रकारे जिल्ह्यात ५,८८५.६० हेक्टर क्षेत्र आहे. या भागात ११.१८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना आहे नुकसान भरपाईची प्रतीक्षा…

जून महिन्यात योग्य पाऊस झाल्यास शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात करतात. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी वेगाने तयारीला लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मशागतीचे काम पूर्ण झाले आहे. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झाले आहे, त्यांना आता शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणुन शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा