जोपर्यंत संपूर्ण देशातून भाजपा साफ होत नाही तोपर्यंत सर्व राज्यांत ‘खेला होबे’ – तृणमूल

16

कोलकत्ता, २२ जुलै २०२१: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातसह अनेक राज्यात मेगा व्हर्च्युअल मोर्चा काढला. शहीद दिनानिमित्त आयोजित या आभासी रॅलीच्या माध्यमातून ममता यांनी बंगाल विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर त्यांचे लक्ष आता दिल्ली सरकारवर असल्याचं स्पष्ट केलं आहे. ममता म्हणाल्या की, जोपर्यंत संपूर्ण देशातून भाजपा साफ होत नाही, तोपर्यंत सर्व राज्यांमध्ये ‘खेला’ होणार. त्या म्हणाल्या की, आम्ही १६ ऑगस्टपासून ‘खेला दिवस’ सुरू करू आणि गरीब मुलांना फुटबॉलचे वाटप करू.

ममता म्हणाल्या- भाजपला स्वतःच्या मंत्र्यांवर विश्वास नाही, हेरगिरी करत आहे

आभासी रॅलीमध्ये ममता म्हणाल्या, ‘आज आपलं स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. भाजपने आमचे स्वातंत्र्य धोक्यात आणंलं आहे. भाजपला त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांवर विश्वास नाही आणि एजन्सींचा गैरवापर केला जात आहे. आमचे फोन टॅप केलेले आहेत. पेगासस धोकादायक आहे. मी कोणाशीही बोलू शकत नाही. हेरगिरीसाठी हे लोक भरपूर पैसे खर्च करीत आहेत. अन्यथा संपूर्ण देश उद्ध्वस्त होईल. भाजपने संघीय रचनेला पाडले आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीत ‘बंगाल आपनी बेटी चाहता है’ अशी घोषणा देणार्‍या ममतांनी २ दिवसांपूर्वी एक नवीन घोषणा जाहीर केली आहे – ‘जिसे देश चाहता है’. ते आणि त्यांचे पुतणे अभिषेक यांचे पोस्टर्स संपूर्ण कोलकातामध्ये पसरलेले आहेत. आता त्या उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, आसाम, तामिळनाडू आणि त्रिपुरासह देशभरात अनेक ठिकाणी आभासी मोर्चा काढत आहे. थेट प्रवाहाबरोबरच ममता यांचे भाषण स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करण्याचीही व्यवस्था केली जात आहे.

२०२४ मध्ये दिल्लीत ममता सरकार- तृणमूल

पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी सांगितलं की, टीएमसी २१ जुलैला आभासी कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार आहे. यासाठी त्रिपुरा, आसाम, ओडिशा, बिहार, पंजाब, यूपी आणि दिल्लीमध्ये मोठी पडदे बसविली जातील. ते म्हणाले की २०२४ मध्ये दिल्लीत ममता सरकार असेल. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेश हा सर्वात मोठा घटक आहे. येथे २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे.

१९९३ मध्ये कोलकाता येथे २१ जुलै रोजी युवा कॉंग्रेसच्या निदर्शनादरम्यान पोलिस गोळीबारात १३ कार्यकर्ते ठार झाले. या निदर्शनाचं नेतृत्व ममता करीत होत्या. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेसने हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली. दरवर्षी २१ जुलै रोजी तृणमूल या दिवशी मोठा मेळावा घेते. गेल्या वर्षी या दिवशी ममतांनी आपल्या कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा