स्थानकाला २० कोटी रुपये खर्च, पण रेल्वे नाही थांबली…

17
Dound to Manmad railway line problems
स्थानकाला २० कोटी रुपये खर्च, पण रेल्वे नाही थांबली.

Dound to Manmad railway line problems : पुणे विभागातील दौंड ते मनमाड विभागामध्ये १० स्थानके अशी आहेत की ज्यावर एकाही गाडीला थांबा नाही. यामध्ये काष्टी, बेलवंडी, रांजनगाव रोड, सरोळा,आकोळनेर,निंबळक, विलंद,वभोरी, पाढेगाव व चिलकी अशा स्थानकांचा समावेश असून येथे एका तरी रेल्वे गाडीला थांबा द्यावा. अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. दौंड ते मानमाड हा पुणे विभागातील महत्वाचा रेल्वे मार्ग आहे. २३७ किलोमीटर असलेल्या या विभागाच्या १८० किलोमीटर रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या काही महिन्यात होणार आहे.

अनेकदा प्रवासांचा प्रतिसाद कमी मिळेल या भितीने रेल्वे प्रशासन नागरिकांची मागणी असूनही स्थानकाला थांबा देत नाहीत. मात्र, रेल्वे प्रशासनाने एखाद्या रेल्वेला थांबा दिला तर संपूर्ण गावाची सोय होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एखाद्या तरी रेल्वे गाडीला थांबा द्यावे, अशी मागणी स्थानीक प्रवासी करीत आहेत.यावर पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बहरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेतो. यात विभागाचा कोणताही हस्तक्षेप नसतो.”जर एखाद्या स्थानकावर थांबा देण्याची प्रवाशांची मागणी असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव मांडावा. त्यावर नक्की विचार केला जाईल.

एका स्थानकाला २० कोटी खर्च :

एका स्थानकला बांधण्यासाठी १५ ते २० कोटी रुपये खर्च येतो. असे १० स्थानके केवळ बांधण्यात आले असून या मेनलाइन वरून केवळ एकच रेल्वे धावते. पण थांबा मात्र,एकाही रेल्वे गाडीला नसल्याने प्रवाशांना याचा काहीच फायदा होत नाहीये.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा