लेह, 3 ऑक्टोंबर 2021: जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याचे kaal लेह येथे गांधी जयंतीनिमित्त अनावरण करण्यात आले. लेहमधील झांस्कर टेकडीवर लावलेला हा तिरंगा खादीचा असून हाताने बनवलेला आहे. हा 225 फूट लांब, 125 फूट रुंद आणि वजन 1400 किलो आहे. याला बनवण्यासाठी 49 दिवस लागले. हा झेंडा 37,500 चौरस फूट जागा व्यापतो.
लडाखचे उपराज्यपाल आर के माथूर यांनी याचे अनावरण केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे देखील उपस्थित होते. हा तिरंगा खादी विकास मंडळ आणि मुंबईतील एका छपाई कंपनीने संयुक्तपणे बनवला आहे. 8 ऑक्टोबर रोजी हवाई दलाच्या दिवशी हिंडन एअरबेसवर नेला जाईल.
इंजीनियर रेजिमेंट च्या 150 सैनिकांनी 2000 फूट उंचीवर नेला झेंडा
तो फडकवण्यासाठी, इंजीनियर रेजिमेंट च्या 150 सैनिकांनी तिरंगा खांद्यावर उचलला आणि जमिनीपासून 2000 फूट उंचीवर नेला. शिखर गाठण्यासाठी सैनिकांना दोन तास लागले. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
K 9-वज्र तोफांचीही चाचणी केली
एलएसीवर चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारताने पूर्व लडाखमध्ये आपल्या k -9 वज्र तोफा तैनात केल्या आहेत. 12000 ते 16000 फूट उंचीवर लडाखच्या उंच डोंगराळ भागात हे K-9 वज्र हॉविट्जर तैनात करण्यात आले आहेत. उंच डोंगराळ भागात चीनच्या विरोधात या तोफांच्या अग्नीशक्तीची चाचणी करण्यासाठी ही तैनाती करण्यात आली आहे. लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात एक वर्षाहून अधिक काळ वाद आहे. दोन्ही सैन्य युद्ध आघाडीवर तैनात आहेत.
वाळवंटापासून ते डोंगराळ भागात चालण्यास सक्षम
भारतीय लष्करात बोफोर्स तोफानंतर 1986 पासून मोठ्या प्रमाणावर आर्टिलरी समाविष्ट करण्यात आलेला नाही. या संदर्भात, 100 k -9 वज्र-टी तोफांचा सैन्यात समावेश करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एल अँड टी ने लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांना 100 वी तोफ सुपूर्द केली. हे सेल्फ-प्रोपेल्ड आर्टेलेरी गन आहेत म्हणजे या सेल्फ-प्रोपेल्ड आर्टेलेरी गन ट्रक किंवा इतर कोणत्याही मार्गानं नेण्याची गरज नाही, उलट त्यांना टँकसारखी चाकं आहेत आणि ती वाळवंटात आणि डोंगरावर चालू शकतात.
38 किमी मारक क्षमता
K -9 वज्र तोफेची श्रेणी 38 किमी आहे. हे चारी दिशांना फिरून जीरो रेडियस वर हाल्ला करू शकते. 50 टन वजनाची 155 मिमी / 52 कॅलिबरची तोफ 47 किलोची बुलेट फेकू शकते. ही तोफ 15 सेकंदात 3 गोळ्या झाडण्यास सक्षम आहे. यात 155 मिमी तोफ आहे, ज्याची श्रेणी 18 ते 52 किमी आहे. यात टाक्यांप्रमाणे ट्रॅक आहे, जेणेकरून ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर चालू शकेल. त्याचे शक्तिशाली इंजिन 67 किमी प्रतितास वेग देते. यात 5 सैनिकांचा एक क्रू आहे, जो टँकसारख्या मजबूत चिलखताने पूर्णपणे संरक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे