नवी दिल्ली: उत्पादन शुल्क करामध्ये वाढ झाल्यामुळे प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होणार आहे. सौदी अरेबिया आणि रशियामधील दर युद्धामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये विक्रमी घसरण झाली आहे.
सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात चाललेल्या तेलातील किमती वरील वादामुळेकच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्याप्रमाणावर पडले आहेत. एकाच दिवशी २० टक्क्यांनी कच्चा तेलामध्ये घसरण झाली होती. एकेकाळी ८० ते ९० डॉलर प्रति बॅलर एवढी किंमत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता ३५ ते ४० डॉलर प्रति बॅलर एवढे झाले आहेत.
केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क करामध्ये तीन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असताना जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रतिलिटर पेट्रोलवर रस्ते उपकरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
सरकारने ५ त्रिल्लियन इकॉनोमी बनवण्याची घोषणा केली तर खरी परंतु भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अचानक आलेल्या मंदीमुळे आणि त्यातच आता कोरुना ची भर पडल्यामुळे सरकारला आता जमवाजमव करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचाच एक उपाय म्हणून कच्चा तेल यांच्या कमी झालेल्या किमतींचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा सरकारचा निर्धार आहे.