आगामी पावसाळी अधिवेशन इगतपुरीमध्ये व्हावे: हिरामण खोसकर

नाशिक, दि.३१ मे २०२०: एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राज्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील प्रतिनिधी प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने अजूनही दैनंदिन व्यवहार ठप्प आहे शिवाय विकास कामे थांबली आहे. कोरोनाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर सुद्धा झाला असून आगामी पावसाळ्यात होणारे अधिवेशन निसर्गाने नटलेल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात घ्यावे असे पत्र काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

इगतपुरी हे शहर निसर्गाने दिलेल्या अनमोल देणगीचे प्रतीक आहे. पावसाळयात अनेक नयनरम्य सौंदर्यसृष्टी इथं अनुभवायला मिळते. सद्यस्थितीत इगतपुरीमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसून आगामी काळात होणारे संभाव्य पावसाळी अधिवेशनसाठी विधानभवन तात्पुरत्या स्वरूपात इगतपुरी शहरात घ्यावे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मंत्री महोदय, विधानसभा सदस्य, अधिकारी, यांना या शहरात येण्यासाठी सहज मार्ग उपलब्ध आहे. शिवाय राहण्यासाठी प्रशस्त रिसॉर्ट देखील असून कोरोनामुळे प्रशासकीय कामकाज थांबले आहे. परिणामी शासकीय योजना, प्रकल्प रखडले आहे त्यासाठी आपण येत्या पावसाळी अधिवेशन इगतपुरीमध्ये घेण्याची विनंती आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा