उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय २२ डिसेंबरनंतर 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कल विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६९ आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. . त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले. आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, की “उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय २२ डिसेंबरनंतर होईल.” मंत्रिमंडळ विस्तारासाठी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा