दिल्ली विधानसभेत आज गदारोळ, केजरीवाल सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मागं

दिल्ली, २९ मार्च २०२३: केजरीवाल सरकारविरोधात भाजपने आज दिल्ली विधानसभेत मांडलेला अविश्वास प्रस्ताव मागं घेण्यात आलाय. दिल्ली सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षनेत्यांनी मागं घेतलाय. वास्तविक, नियमांनुसार, अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १/५व्या आमदारांची (१४ आमदार) आवश्यकता असते, परंतु भाजपकडं फक्त ८ आहेत. अर्थसंकल्पापूर्वी भाजपच्या आमदारांनी आम आदमी पार्टी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस सभापती रामनिवास गोयल यांना दिली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी अर्थसंकल्पानंतर पूर्ण नियमावलीसह विचार केला जाईल, असं त्यावेळी सांगितलं होतं.

सोमवारी विधानसभेत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. त्यानंतर, नियम २८० अन्वये, भाजप आमदारांनी त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित मुद्दे उपस्थित केल्यानंतर, भाजपने पुन्हा विधानसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. त्यानंतर सभापती रामनिवास गोयल यांनी विरोधी पक्षनेते रामबीर बिधुरी यांच्या प्रस्तावावर चर्चेला मंजुरी दिली होती, मात्र आज भाजपने अविश्वास प्रस्ताव मागं घेतला.

मंगळवारी विधानसभेत सभागृहाचं कामकाज गदारोळ झाले. सभागृहात अदानी प्रकरणावर चर्चा सुरू असताना आमदार मदनलाल यांनी त्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव घेतलं. ज्याचा भाजप आमदारांनी या प्रकरणावरुन गदारोळ केला. यानंतर सभापतींनी पंतप्रधान हा शब्द वापरू शकतो, नाव घेऊ शकत नाही, असा आदेश दिल्यानं भाजपच्या आमदारांनी या विषयावर गदारोळ सुरूच ठेवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा