नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२० : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा-२०१९ चा निकाल जाहीर केला आहे. प्रदीप सिंगने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (मेन्स) परीक्षा २०१९ मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. जतीन किशोर दुसर्या स्थानावर तर प्रतिभा वर्मा तिसर्या क्रमांकावर आहेत.
२० जुलैपासून यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी मुलाखतीस प्रारंभ झाला. त्याचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर झाला. उमेदवार त्यांच्या यूपीएससीच्या नागरी सेवेचा निकाल त्यांच्या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांच्या रोल नंबरनुसार तपासू शकतात. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे या मुलाखती यापूर्वी पुढे ढकलल्या गेल्या होत्या.
यूपीएससीमधील प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत. यावेळी कोरोना कालावधीमुळे काही यूपीएससी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या. नंतर, यूपीएससीने मुलाखतीत आलेल्या सर्व उमेदवारांना बर्याच सुविधा दिल्या होत्या.
महाराष्ट्रातील गुणवंत
नेहा भोसले – देशात १५ वी, मंदार पत्की (बीड) – देशात २२ वा राज्यात दुसरा, योगेश अशोकराव पाटील – देशात ६३ वा, लक्ष्मण चव्हाण – देशात १०९
यूपीएससी दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस),भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस)आणि इतर केंद्रीय सेवांसाठी परीक्षा घेते. नागरी सेवा परीक्षा २०२० या ३१ मे रोजी होणार होत्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी