नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२१ : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स अधिसूचना: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आगामी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) साठी अधिसूचनेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाने प्रीलिम्स परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. आयोगाच्या परीक्षा दिनदर्शिकेत भरती परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, UPSC सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स अधिसूचना पुढील वर्षी ०२ फेब्रुवारी २०२२ रोजी जारी केली जाईल. यासाठीचे अर्ज ०२ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहतील. रविवार ०५ जून रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल. भारतीय वन सेवा (UPSC IFS २०२२) परीक्षेचे वेळापत्रकही तसेच राहील.
आयोगाने आपल्या परीक्षा कॅलेंडरमध्ये इतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, यूपीएससी आयईएस, आयएसएस परीक्षा २०२४ जून रोजी आणि संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा २० फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल. यूपीएससी सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ यासह इतर सर्व भरती परीक्षांच्या तारखा तपासण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आणि परीक्षेचे टाईम टेबल डाउनलोड करू शकता.
संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा https://www.upsc.gov.in/sites/default/files/AnnalPrg-Exam-RT-2022-engl-130821.pdf
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे