उरुळी कांचन येथे खासगी डॉक्टरांचा आभार मानून सत्कार करण्यात आला..!

उरुळी कांचन २३ सप्टेंबर २०२० कोरोनाच्या काळात उरुळी येथील खाजगी डॉक्टरांचे ही खूप सहकार्य असल्याचं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी सांगितले. आपण सर्वांनी मिळून कोरोनाला आपल्या गावातून हद्दपार करू असे उरुळी येथील सर्व डाॅक्टरांना डाॅक्टर कदम यांनी अहवान केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यास सांगितली होती. त्यानुसार उरुळी मधे ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये उरुळी कांचन येथील बारा खासगी डाॅक्टरांनी स्वतःहून सहभाग घेतला असुन मोहीम पार पाडली अशी माहिती डाॅक्टर सुचेता कदम यांनी दिली. या सर्व डाॅक्टरांनी आपला मौल्यवान वेळ देऊन सहकार्य केल्याबद्दल डाॅक्टरांचे आभार मानून त्यांचा सत्कार उरुळी कांचन येथील पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर यांनी केला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेमध्ये बारा खासगी डॉक्टरांनी सहभाग घेतला असुन डाॅक्टर समीर ननवरे, डाॅ. राठोड, डाॅ. गाडे, डाॅ. धिवार, डाॅ. गोते, डाॅ. परदेशी डाॅ. गांगुर्डे व इतर डॉक्टर होते. या सर्व डॉक्टरांचा व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांचाही सत्कार पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर सुचेता कदम, डॉक्टर सोनवणे, आरोग्य सहाय्यक जाधव, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर व खासगी डॉक्टर उपस्थितीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा