उर्मिला मातोंडकर करणार शिवसेनेत प्रवेश…

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२०: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा राजकारणात आपले नशीब आजमावणार आहेत. याआधी त्यांनी काँग्रेसमध्ये आपले नशीब आजमावले होते मात्र, त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता.

माध्यमांमध्ये आज उर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर उद्या दुपारी ४ वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचं नक्की झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा