मुंबई ११ फेब्रुवारी २०२५ : संगीत व नृत्याच्या अनोख्या संगमाने प्रेक्षकांना मोहवणाऱ्या सुमुख चित्र निर्मित उर्मिलायन या नाटकाने Zee नाट्यगौरव स्पर्धेत ११ नामांकने पटकावत मोठे यश संपादन केले आहे. उत्कृष्ट व्यावसायिक नाटक, लेखक, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, नेपथ्य यांसह विविध विभागांमध्ये या नाटकाने यश संपादन केलं आहे.
Zee नाट्यगौरवचा अंतिम निकाल २० तारखेला जाहीर होणार असून, सर्वच विभागांत विजेतेपद मिळवण्याचा आत्मविश्वास कार्यकारी निर्माता निखिल जाधव यांनी व्यक्त केला आहे. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र आणि डॉ. स्मिता दातार यांनी केलं आहे.
झी नाट्य गौरव’ पुरस्कारासाठी उर्मिलायनला पुढील विभागांतर्गत नामांकने जाहीर झाली आहेत.
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सुनिहार
सर्वोत्कृष्ट रंगभूषा- उदयराज तांगडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन- बंटी काळे
सर्वोत्कृष्ट संगीत- निनाद म्हैसकर
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना- चेतन ढवळे
सर्वोत्कृष्ट नेपथ्य- अरूण राधायन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- कल्पिता राणे
सर्वोत्कृष्ट लेखन- सुनील हरिश्चंद्र
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- निहारिका राजदत्त
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- सुनील हरिश्चंद्र
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर