रोपळे येथील हजरत ख्वाजा खलील दर्ग्याचा उरुस रद्द

रोपळे(ता.माढा), दि. ११ जुलै २०२०: येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हजरत ख्वाजा खलील रहेमतुल्लाह अलै यांचा उरुस दरवर्षी मोठ्या थाटा माटात भक्तिभावात साजरा केला जातो. परंतु, संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर संदल, छबिना, कुसत्या, देव आणने, उत्सव यासह इतर धार्मिक कार्यक्रम रदद् करण्यात आल्याची माहिती यात्रा पंच कमिटीच्या सदस्यासह ग्रामस्थांनी दैनिक जनमतशी बोलताना दिली.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने जमावबंदी सोबत संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता गावातील मरिआई, लक्ष्मीबाई, म्हसोबाच्या यात्रा रदद् करण्यात आल्या आहेत नागरिकांनी घरी सुरक्षित राहून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले. या दरम्यान गावकऱ्यांनी ८ ते १३ जुलै पर्यंत जनता कर्फ्यू घोषित केला. सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत बैठक पार पडली.

यावेळी प्रहार जिल्हा कार्याध्यक्ष आबासाहेब आदलिंगे पोलीस पाटील नवनाथ गवळी रोपळयाचे उपसरपंच तानाजी दास नंदकुमार कुलकर्णी सुधिर गोडगे बापूसाहेब निंबाळकर तानाजी गोडगे आसिफ मुलाणी बाळासाहेब भोंग रहिमान शेख निशांत दास पिंटू मस्तुद छोटू पाटील आदी उपस्थित होते.

महमारीचा संसर्ग पाहता सगळीकडे लॉकडाऊन आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करत ग्रामस्थांनी यावर्षी गावातील सर्व उत्सव रद्द केले असून यावेळेस पशुबळी विधी करण्यात येणार नाही यांची नोंद सर्व भाविक भक्तांनी घ्यावी – उपसरपंच तथा सदस्य यात्रा पंच कमिटी, रोपळे तानाजी दास

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा