ऋषभ पंत च्या वाढदिवसानिमित्त उर्वशी रौतेलाने केली खास पोस्ट.

10

मुंबई, ५, ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं जवळच नात आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंशी लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेलाची खूप चर्चा आहे. आज उर्वशीने तिच्या सोशल मी अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये उर्वशी फ्लाईंग किस देताना दिसत आहे आणि तिने ‘हॅपी बर्थडे’ असे कॅप्शन ही दिला आहे.

योगायोग म्हणजे भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त क्रीडा व मनोरंजन जगतातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता बर्थडे विश केलेला आहे. आज ऋषभ पंत चा बर्थडे आणि तिने शेअर केलेले व्हिडिओ च टाइमिंग पाहता नेटकऱ्यांनी अंदाज बांधला आहे की उर्वशीने रिषभ साठीच पोस्ट केली आहे.

या व्हिडिओमुळे तिच्या आणि ऋषभ पंत बद्दलच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद पाहायला मिळाला होता, उर्वशीच्या मुलाखतीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला होता, त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो सुद्धा केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा