अमेरिकेने घेतला काबूल स्फोटाचा बदला, हवाई हल्ल्यात ‘षड्यंत्रकार’ आयएस दहशतवादी ठार

काबूल, २९ ऑगस्ट २०२१: अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात मोठी कारवाई केली आहे.  काबूल स्फोटाला प्रतिसाद म्हणून अमेरिकी लष्कराने आयएसच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ला केला आहे.  असे सांगितले जात आहे की अमेरिकन लष्कराने मानव रहित विमानाने नांगरहारमधील इसिस-के च्या लपण्याच्या ठिकाणावर हवाई हल्ले केले आहेत.  अमेरिकेच्या लष्कराने काबूल स्फोटातील सूत्रधारांनाही ठार केल्याचा दावा केला जात आहे.
हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेने लोकांना काबूल विमानतळावरून माघार घेण्यास सांगितले आहे.  काबूल विमानतळावर आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची भीती अमेरिकेला आहे.  पेंटागॉनने दावा केला आहे की लक्ष्यित टारगेट नष्ट करण्यात आले आहे.  आयएसआयएस-के च्या छुप्या ठिकाणावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे..
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील विमानतळाबाहेर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत १६९ अफगाणी आणि १३ अमेरिकन सैनिक ठार झाले.  इसिस-के या दहशतवादी संघटनेने या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.  मात्र, ४८ तासांच्या आत अमेरिकेने सूड घेतला आहे.  त्याच वेळी, तालिबानने अमेरिकेच्या या कृतीपासून स्वतःला दूर केले आहे.
 काबूल स्फोटानंतर अमेरिकेने म्हटले होते की आम्ही या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना क्षमा करणार नाही.  अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की अमेरिका त्याचा बदला घेईल.  त्यासाठी किंमत मोजावी लागेल.  मात्र, काबूल विमानतळावरील हल्ल्यांमध्ये तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांच्यातील सहभागाचा पुरावा अमेरिकेला अद्याप मिळालेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा