न्यूऑर्क, ११ सप्टेंबर २०२०: प्रसिद्ध महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हीला दुखापत झाल्यामुळे चांगली सुरुवात मिळालेली असून सुद्धा गुरुवारी रात्री झालेल्या यूएस ओपन टेनिस टुर्नामेंट मध्ये तिला पराजयाचा सामना करावा लागला आहे. तिचे २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचे स्वप्नं अपूर्ण राहून गेले आहे.
सेमी फायनलच्या सामन्यात तिला चांगलीच टक्कर देत अजारेंका हिने १-६,६-३,६-३ असा सामना आपल्या नावावर केला. तसेच अजारेंका हिने सण २०१३ नंतर प्रथम वेळी आपले स्थान ग्रँड स्लॅम टुर्नामेंट च्या फायनल मध्ये मिळवले आहे.
सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत अजारेंका म्हणाली, ” इथे पोहोचण्यासाठी मला ७ वर्षांचा अवधी लागला. हा माझा आवडीचा क्रमांक आहे. फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पराजित करावे लागते. अजारेंका हिने २०१३ साली ऑस्ट्रेलियन ओपनच चे जेतेपद मिळवले होते.
सेरेनाने सामन्यात पहिला सेट जिंकला त्यानंतर असे वाटू लागले होते की सेरेना या वेळी सुद्धा फायनल मध्ये पोहोचेल. परंतु अजारेंकाने दुसऱ्या सेटमध्ये लगातार पाच गेम जिंकले आणि तिसऱ्या सेट मध्ये ३-० ची आघाडी घेतली आणि सेरेना विल्यम्सला वापसी करण्याचा विचार ही करू दिला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे