नवी दिल्ली, २०ऑक्टबर २०२२: आंतरराष्ट्रीय तस्कर सुभाष कपूरची आर्ट गॅलरी, अन्य कला दालनांसह अनेक तस्करी नेटवर्ककडून जप्त केलेल्या ३०७ ऐतिहासिक मूर्ती व कलाकृती, न्यूयाॅर्क येथे भारतीय वाणिज्य दूतावासाकडे अमेरीकेने सोपवल्या.
भारतातून अनेक वर्षांपासून, प्राचीन संस्कृती चा ठेवा असलेल्या कलाकृतींची जगभर तस्करी होत असते. त्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात करोडो रुपयांची आहे. आता ज्या कलाकृती भारताला परत मिळाल्या आहेत त्यात चोल युगातील देवीच्या मूर्ती, विनायकाची मूर्ती, लक्ष्मी-नरसिंह व मुरुगाची लाकडी मूर्तीही आहे. तसेच एका गरुडासोबत विष्णू आणि लक्ष्मीची मूर्तीही आहे. ती ११व्या शतकातील आहे. त्यांची किंमत अंदाजे ३३ कोटींपेक्षा अधिक आहे.
सुभाष कपूर कडून २३५ कलाकृती जप्त केल्या. त्याने या मूर्ती भारत आणि इतर देशांकडून तस्करीच्या माध्यमातून मागवल्या होत्या. त्याच्याकडून व न्यूयॉर्कमध्ये नॅन्सी विनरकडून ५ कलाकृती जप्त केल्या. उर्वरित ६६ कलाकृती अनेक छोट्या तस्करांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जप्त केल्या.अमेरिकन अधिकाऱ्यांनी या मूर्ती गेल्या १५ वर्षांत जप्त केलेल्या होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे