भारताची कन्या बनणार अमेरिकेची उपराष्ट्रपती, अधीर रंजन चौधरी यांचं ट्विट

नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर २०२०: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान पूर्ण झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प अद्यापही पिछाडीवर आहेत तर जो बिडेन यांचं अध्यक्षपद निश्चित मानण्यात येत आहे. यासह जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस असणार आहेत. याबद्दल भारतातही उत्साह आहे. कमला हॅरिस यांची आई श्यामला गोपालन तामिळनाडूच्या होत्या.

कमला हॅरिस यांच्या भव्य आणि दिव्य स्वागतासाठी भारत सरकारनं तयारी करायला हवी, असं मत कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय वंशाची असल्यानं आम्हाला अभिमान आहे की भारताची कन्या अमेरिकेची उपराष्ट्रपती होणार आहे आणि भविष्यात ती अमेरिकेची राष्ट्रपतीही होऊ शकते.

जो बिडेन यांनी आतापर्यंत २६४ इलेक्टोरल मतं मिळविली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी त्यांना आणखी ६ मतांची गरज आहे, तर ते बर्‍याच राज्यात आघाडीवर आहेत. त्यांना ३०० इलेक्ट्रॉल मतं मिळतील असं त्यांनी म्हटलं आहे.

जर जो बिडेन राष्ट्राध्यक्ष झाले तर सिनेटर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होईल. ही भारतासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. यासह, जर कमला हॅरिस भविष्यात राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सामील झाल्या तर या विजयामुळं त्यांना अधिक बळ मिळंल.

लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी ट्विट केलं की, “भारताची कन्या कमला हॅरिस उपराष्ट्रपती म्हणून जगातील सर्वात प्राचीन लोकशाहीचे नेतृत्व करणार आहे आणि नजीकच्या काळात त्या या शक्तिशाली देशाच्या राष्ट्रपतीही होऊ शकतात.”

अधीर रंजन चौधरी म्हणाले की कमला हॅरिसचा आम्हाला अभिमान आहे, भारतीय म्हणून त्यांचं भव्य स्वागत करण्यास भारत सरकारनं तयार असलं पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा