गोल पोस्ट महाराष्ट्र गाई, म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर,पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमाल केला जप्त

गाई, म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीनचा वापर,पोलिसांनी छापा टाकुन मुद्देमाल केला जप्त

मालेगाव,३१ मे २०२३ : बाजारात आजकाल अनेक ठिकाणी दुधात भेसळ व्हायला लागली आहे. मालेगाव शहरातील हिरापुरा भागात पोलिसांनी छापा टाकत मोहम्मद इकबाल या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक हजार ऑक्सिटोसीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

मालेगाव मध्ये काही गोठ्यांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात आली होती. औषधाच्या बाटल्याचा वापर जनावरांचे दूध वाढविण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.मालेगाव परिसरात सर्रास या जीवघेण्या औषधाचा वापर केला जातो. पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईवरून ही बाब समोर आली आहे.

या औषधाचा वापर अन्य वैद्यकीय कारणासाठी देखील होत असतो. मात्र जनावरांचे दूध वाढावे, यासाठी या औषधांचा सर्रास वापर होतो. त्याचा अवैधरित्या साठा करून ते मालेगावमध्ये वितरित होत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.शहरातील हिरापुरा भागातील मोकळ्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात मोहम्मद अन्वर मोहम्मद इकबाल हा विनारंगाच्या ऑक्सिटोसीन औषधाच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक हजार प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक प्रशांत विठ्ठल ब्राह्मणकर यांनी संशयितांविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्व प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version