उस्मानाबाद येथील मराठी साहित्य संमेलनात गोंधळ

उस्मानाबाद : मराठी साहित्य संमेलनात एका परिसंवादाच्यावेळी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. समजात बुवाबाजीचं प्रश्न वाढलं आहे का? या विषयावर परिसंवाद सुरु असताना हा गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले. त₹जगन्नाथ पाटील नामक व्यक्तीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा कल्पना न देता अचानक कार्यक्रम सुरु असताना मला दोन मिनिटं बोलू द्या, असा अट्टहास करत माईक ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संमेलनात एकच गोंधळ उडाला.

उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात समाजातील वाढतं बुवाबाजीचं प्रस्थ याविषयावर परिसंवाद सुरु होता. काही तरुणांनी संतसाहित्यामुळे समाजात बुवाबाजीचं प्रमाण वाढत असल्याचं म्हणत बोलू देण्याची मागणी केली.
त्यानंतर जगन्नाथ पाटील या व्यक्तीने देखील आपण पत्रकार असल्याचं सांगून बोलू द्या म्हणत माईक ओढला. त्यानंतर मंचावर एकच गोंधळ झाला. यानंतर आयोजकांनी तात्काळ त्यांना मंचावरुन खाली उतरवले. या गोंधळातच साहित्य संमेलन पुन्हा सुरु झाले. याबाबत वृत्त वाहिन्यांनी वृत्त दिले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा