पिंपरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तम थोपटे, उपसरपंचपदी नंदा थोपटे

पुरंदर, १० फेब्रुवरी २०२१: पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ज्या ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं त्या पिंपरे  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उत्तम कृष्णा थोपटे तर उपसरपंचपदी नंदा संजय थोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील प्रमुख  पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिव सेना यांच्या आघाडीच्यावतीने विजय थोपटे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढवली होती. त्याच्या  विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे व सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक दिलीप थोपटे यांच्या पॅनल ने  निवडणूक लढवली होती. यामध्ये दिलीप थोपटे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला होता. तर विजय थोपटे यांच्या पॅनलचा चा सर्व जागेवर म्हणजे ११ जागेवर विजय झाला होता.

आज सरपंच पद उपसरपंच पदासाठी  झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी उत्तम थोपटे  तर उपसरपंचपदासाठी नंदा थोपटे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
निवडीनंतर पॅनल प्रमुख विजय थोपटे यानी सरपंच उपसरपंच यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद  थोपटे,  संतोष थोपटे, अमर थोपटे, सचिन गायकवाड ,ज्ञानेश्वर जाधव, महेश थोपटे, सुरेश जाधव, अनिल कुंभार, भरत थोपटे इत्यादी उपस्थित होते..

न्युज अनकट प्रतिनिधी:  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा