सोल: गेल्या काही वर्षांपासून वादांमध्ये असलेल्या उत्तर कोरिया या देशाने काल क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. या देशावर क्षेपणास्त्र चाचणी तसेच अनुबोंब चाचणी करण्यास निर्बंध लावण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान प्रत्येक देश न्यूक्लिअर पॉवर होण्याच्या शर्यतीत होता. मात्र हिरोशिमा आणि नागासाकी या दोन घटनांनंतर या गोष्टीकडे गांभीर्याने बघितले जाऊ लागले. त्यानंतर ज्या देशांकडे अनुशक्ती होती त्यांच्यापर्यंत हे मर्यादित ठेवण्यात आले व त्यानंतर जर कोणी असे केले तर त्यावर निर्बंधने लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने उत्तर कोरियावर याआधी निर्बंधने लावण्याचा प्रयत्न केला होता व तसा समझोता हि या देशांमध्ये झाला होता की उत्तर कोरियाकडून अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले जाणार नाही. परंतु अमेरिका बरोबरील शांतता चर्चा थांबली असताना शेपनस्त्र चाचण्या घेण्याचे उत्तर कोरियाचे धोरण कायम आहे. या देशाने काल पूर्व समुद्रात दोन क्षेपणास्त्रे डागली अमेरिकेच्या दाव्यानुसार हि आंतरखंडीय होती मात्र उत्तर कोरियाने याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र चाचणी घेण्यावर निर्बंध आहेत मात्र या देशाने हे बंधन कधीही पाळले नाही.