उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची प्रकृती चिंताजनक

ह्यांगसान( वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

साधारणतः १५ दिवसंपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे किम जोंग उन यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

या संदर्भात एका संकेतस्थळाने वृत्त दिलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून किम जोंग उन यांची प्रकृती बिघडली होती. ते जास्त प्रमाणात धुम्रपान करत असून त्यांना स्थूलपणाचाही त्रास असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ११ एप्रिल रोजी किम जोंग उन हे शेवटचे सर्वांसमोर आले होते. त्यानंतर १५ एप्रिलला त्यांनी आपल्या आजोबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले नव्हते.

किम जोंग उन यांच्यावर ह्यांगसान येथील एका ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्या ठिकाणचे नाव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दर्शवला.

तसेच त्यांच्या ब्रेन डेड झाल्याच्या चर्चांवर अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच उत्तर कोरियातून कोणतीही अधिक माहिती मिळणं शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा