उत्तरप्रदेश मध्ये हुंडा न दिल्याने सासऱ्याने सुनेला टोचले एचआयव्ही बाधित इंजेक्शन. !

25

उत्तरप्रदेश १५ फेब्रुवारी २०२५ : आजवर आपण कोणत्याना कोणत्या कारणावरून अनेक गुन्हा घडलेले पाहिले आहेत. पण अशीच एक धक्कादायक घटना उत्तरप्रदेश मध्ये घडली आहे. ती म्हणजे मुलाकडच्या कुटुंबाने मुलीकडील कुटुंबाला हुंड्याची मागणी केली. तत्पूर्वी मुलीकडून ती मागणी पूर्ण न झाल्याने सासऱ्याने आपल्या सुनेला एचआयवी बाधित इंजेक्शन दिले आहे. याबबत सहारनपुरमधील एका न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसाना सासऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला सहारनपूरची रहिवासी असून आम्ही तिचा पती (३२ वर्ष), मेहुणा (३८ वर्ष) , सासू (५६ वर्ष ) यांच्या विरोधात गंगोह पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न ) ४९८ अ ( पती किंवा त्याच्या नतेवाईकांकडून महिलेवर क्रूरता ) ४०६ (विश्वासघाताचा गुन्हेगारी भंग )आणि संबंधित हुंडा कलमांखाली एफआयआर दाखल केल्याची माहिती सहारनपुरचे एसपी यांनी सागर जैन यांनी दिली.

हुंडा म्हणून १० लाख रुपये आणि एसयूव्ही कार मागितली होती

चौकशी दरम्यान पोलिसांनी सांगितले की, ही घटना मे २०२४ मध्ये हरिद्वार येथील महिलेच्या सासऱ्याच्या घरी घडली. संबंधित महिलेच्या वाडिलांनी न्यायालयात सांगितले की त्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न केले आणि लग्नावर सुमारे ४५ लाख रुपये खर्च केले.” आही वराच्या कुटुंबाला एक- कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि १५ लाख रुपये रोख दिले, परंतु त्यांनी अतिरिक्त १० लाख रुपये रोख आणि एक मोठी एसयूव्ही मागितली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा