लखनऊ, २१ सप्टेंबर २०२०: आपल्या अजब विधानांसाठी आणि नामांतराच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा अजब दावा केलायं. ”उत्तर प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर नेऊ” असं ट्विट त्यांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ही $5 ट्रिलियन पर्यंत नेऊ असं आश्वासन दिलं होत. मात्र प्रत्यक्षात भारताचा विकास दर सध्या -२३ टक्क्यांपेक्षाही नकारात्मक पद्धतीनं घसरला आहे. केंद्रानं अनेक सरकारी कंपन्या विकल्या, रिजर्व बँकेकडून कर्ज घेतलं मात्र तरीही भारताच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरूच आहे.
अशातच योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलेलं नवं आश्वासन कितपत सत्यात उतरेल याचा अंदाज सध्याची परिस्थिती पाहता लावता येतो. महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दाव्यानुसार त्यांनादेशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करायची आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार त्यात उत्तर प्रदेशचा वाटा हा सुमारे $1 ट्रिलियन असेल तर मग बाकीची राज्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत किती टक्के योगदान देतील? आणि उत्तर प्रदेश एकटेच $1 ट्रिलियन एवढी अर्थव्यवस्था उभारू शकतो का? हा प्रश्न पडतो.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटनंतर आता त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी विचारलं कि $5 ट्रिलियन मध्ये किती शून्य असतात? तर काहींनी म्हटलंय कि देशावर १०१.३ लाख करोड कर्ज असताना हे कसं शक्य आहे? अशा अनेक कमेंट्स आता योगी आदित्यनाथ यांच्या या ट्विटवर येतायत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे