चाळीसगावच्या व्ही.एच.पटेल शाळेत निवडणूक प्रक्रियेव्दारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

चाळीसगाव ३१ जुलै २०२४ : नवीन शालेय वर्षाची सुरुवात होऊन दीड महिना उलटला, जुन्या विद्यार्थ्यांसह नवीन विद्यार्थी शाळेत दाखल झाले, त्यांची ओळख झाली, वर्गाची जबाबदारी नेमून देण्यासाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल शाळेतील उपशिक्षकांपैकी अजय कोतकर यांनी इयत्ता चौथी ड या वर्गाला लोकशाही पद्धतीने निवडणुक कशी लढविली जाते सांगून वर्गमंत्री मंडळ गठीत करण्यात आली. वर्गशिक्षक अजय कोतकर यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना प्रचार करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती. तसेच निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम ५रू घेऊन अर्ज भरून घेतले. आलेल्या अर्जाची छाननी करून घेऊन, माघार घेणे तसेच प्रचार करणे या निवडणूक विषयक सर्व बाबी पूर्ण करून घेत ३० जुलै रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पाडून घेतली. त्याच दिवशी मतदान घेऊन लागलीच निकाल घोषित करण्यात आला.

एकूण पाच पदासांसाठी १५ विद्यार्थी निवडणुकीत उभे होते. याकामी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा नानकर यांनी निवडणूक अधिकारी तर झोनल ऑफिसर म्हणून डॉ. संतोष मालपूरे यांनी कामकाज पाहिले. या निवडणूक प्रक्रियेसाठी संस्थेचे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष आर.सी.पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, संस्थेचे व्हा. चेअरमन योगेश अग्रवाल, शाळेचे चेअरमन जितेंद्र वाणी, मुख्याध्यापिका मंजुषा नानकर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. व या विशेष उपक्रमाचे कौतुक केले.

वर्गाच्या पाच विद्यार्थ्यांकडे मंत्रीपदाची सूत्रे : बाल संसद मंत्रिमंडळ असे,
मुख्यमंत्री तनिष्क निलेश महाजन, उपमुख्यमंत्री साईट विठ्ठल अहिरे, पर्यावरणमंत्री नंदिनी दिपक कोठावदे, आरोग्यमंत्री अलीखान इम्रानखान, क्रीडामंत्री तसेच शिस्त मंत्री मुरलीधर जाधव यांची निवड बहूमताच्या आधारावर करण्यात आली.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा