गोल पोस्ट क्रीडा वी.वी.एस. लक्ष्मण याने केले शुबमन गिल याचे कौतुक म्हणाला…

वी.वी.एस. लक्ष्मण याने केले शुबमन गिल याचे कौतुक म्हणाला…

नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: शुबमन गिल याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केलेल्या फलंदाजीचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. पृथ्वी शॉ च्या जागे त्याला संघात स्थान देण्यात आले होते. त्याने आपल्या फलंदाजीचे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशातच दिग्गज भारतीय क्रिकेटपटू वी.वी.एस. लक्ष्मण याने त्याचे कौतुक करत आपले मत व्यक्त केले आहे.

गिल ने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३ कसोटी सामन्यात फलंदाजी केली. यात त्याने ६ इनिंग मध्ये ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा केल्या. यात संघाला विजय मिळवून देणाऱ्या ९१ धावांचा ही समावेश आहे.

या कामगिरीनंतर वी.वी.एस.लक्ष्मण म्हणाले,’ माझ्या मते गिल असा क्रिकेटपटू आहे ज्याची येणाऱ्या काळात भरपूर चर्चा होणार आहे. फक्त कसोटी क्रिकेट च नव्हे तर क्रिकेट एकदिवसीय आणि टी २० सामन्यात देखील तो नाव कमवेल,’ पुढे ते म्हणाले ‘ मी हे यामुळे बोलत आहे कारण तो कुठल्याही गोष्टी ला हलक्यात घेत नाही. त्याने भारत अ, पंजाब आणि आयपीएल मध्ये भरपूर धावा केल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version