गोल पोस्ट क्रीडा पहिल्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरने निवडला संभावित ११ खेळाडूंचा संघ

पहिल्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरने निवडला संभावित ११ खेळाडूंचा संघ

नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: येत्या ५ फेब्रुवारी पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. अशातच पूर्व भारतीय फलंदाज गौतम गंभीर याने आपला संभावित ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. यात त्याने ५ गोलंदाजांचा समावेश केला आहे.

इंग्लंड विरुद्ध खेळण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे आणि पुन्हा विराट कोहली आपले कर्णधारपद सांभाळणार आहे. तसेच हार्दिक पंड्या याची सुद्धा संघात वापसी झाली आहे. तसेच अक्षर पटेल याला संघात स्थान देण्यात आले आहे. गौतम गंभीर याने आपल्या संभावित ११ खेळाडूंच्या यादीत मयंक अगरवाल, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर याला वगळले आहे.

सुंदर ऐवजी त्याने अक्षर पटेल याला संघात सामील केले आहे. तसेच शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर. अश्विन कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version