राज्यात लंपी रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण आणि शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक- पशुसंवर्धन विभाग

मुंबई, १३ सप्टेंबर २०२२ : संपूर्ण देशामध्ये लंपी रोगाने रौद्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रातही बहुतेक जिल्ह्यामध्ये आता जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये २१ जिल्ह्यांत ३३८ गावामधून २ हजार ६६४ जनावरांना लंपीचा संसर्ग झाला आहे. राज्यात या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी, जनावरांचे लसीकरण आणि शेतकऱ्यांचे सहकार्य या दोन गोष्टींची आवश्यक असल्याचे, पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आतापर्यंत महाराष्ट्रात या रोगाचा धोका कमी होता. परंतु मागील दोन दिवसांपासून प्रादुर्भावात वाढ होत आहे. जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी याची माहिती पशूसंवर्धन विभागास देणे गरजेचे आहे. जर कोणी याविषयी माहिती लपूवुन ठेवली तर पशुसंवर्धन विभागाकडून त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक पशुपालक शेतकरी आजाराची माहिती असूनही त्याच्याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करतात. त्यातून जनावरांना अधिकचा धोका वाढतो. लम्पी रोगाची लक्षणे दिसल्यास किंवा रोगाची लागण झाल्यास त्यावर वेळीच उपचार केले तर हा रोग अटोक्यात येत असल्याचे पशूसंर्धन विभागा कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा