काल २,६९,२०२ लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या २५ व्या दिवशी ६५.२८ लाखांवर पोहोचली आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणामध्ये केवळ २४ दिवसात ६० लाखांचा टप्पा ओलांडत भारताने लसीकरणात आघाडी घेतली आहे.

सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात (उत्तर प्रदेश वगळून) काल झालेल्या लसीकरणाची आकडेवारी

हाती आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आज संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ६५,२८,२१० झाली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या १,३४,६१६ सत्रांचे आयोजन करण्यात आले.

कालच्या दिवसात संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत ७८६० सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये २,६९,६०२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून त्यामध्ये १,०२,९४१ आरोग्य कर्मचारी आणि १,६६,२६१ आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

लसीकरण झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ५५,८५,०४३ आरोग्य कर्मचारी आणि ९,४३,१६७ आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा