पुढील महिन्या पासून सुरू होणार मुलांचं लसीकरण- स्वास्थ्य मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली, २८ जुलै २०२१: मुलांना कोरोना लस देण्याबाबत एक चांगली बातमी आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया म्हणालेत की, ऑगस्टमध्ये मुलांना लसीकरण सुरू करता येईल. मंगळवारी संसदेत झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत मांडवीयांनी हे सांगितलं. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मुलांना लसीकरण करणं ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक मोठं पाऊल असंल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चेतावणी दरम्यान शाळा उघडणं देखील महत्त्वाचं ठरणार असल्याचंही म्हटलंय.

यापूर्वी एम्सचे प्रमुख डॉ.रदीपदीप गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत मुलांच्या लसीला मान्यता मिळण्याची आशा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि जायडस कॅडिलाच्या लसीवरील मुलांवर चाचण्या सुरू आहेत. यापैकी कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांचा निकाल सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे.

जायडस कॅडिलाने चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि आपत्कालीन अधिकृतता अपेक्षित आहे, असं गुलेरिया यांनी म्हटलं होतं. त्याच वेळी, फायजरच्या लससाठी अमेरिकन खाद्य आणि औषध प्रशासनाने (एफडीए) यापूर्वीच मान्यता दिलीय. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की, सप्टेंबरपासून आम्ही मुलांना लसीकरण सुरू करू.

मुलांना लवकर लसीकरण देणं महत्वाचं

भारतासारख्या दाट लोकवस्ती असलेल्या देशात, लवकरात लवकर मुलांना लसीकरण करणं महत्वाचं आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्यासमोर महाराष्ट्राचं उदाहरण आहे. मुंबईतील कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत मुलांमध्ये संसर्ग वाढलाय. आता तिसऱ्या लाटेतही देशभरात मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा