काल ५ राज्यांत मिळून ३१,००० पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२१: सध्या जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. सिरन इन्सटीट्यूट ने उत्पादीत केलेली कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सीन या दोन लसी भारतात सध्या दिल्या जात आहेत. कोविड -१९ लसीकरणाच्या देशभरातील विशाल मोहिमेच्या नवव्या दिवशी काल ५ राज्यांत मिळून ३१,००० पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.
हरियाना  (९०७), कर्नाटक (२,४७२), पंजाब (१००७), राजस्थान (२४,५८६), तामिळनाडू (२,४९४) या राज्यांत मिळून काल संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत एकूण ३१,४६६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. काल संध्याकाळी ६.३० पर्यंत ६९३ सत्रे झाली.
तात्पुरत्या अहवालानुसार कोविड-१९ विरुद्ध लसीकरण झालेल्या  २८,६१३ सत्रांत मिळून  १६ लाखांवर (१६,१३,६६७)आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. लसीकरण मोहिमेच्या नवव्या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत फक्त १० एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला विपरीत परीणाम) नोंद झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा