देशभरात ५८ लाखांहून अधिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली, ८ फेब्रुवरी २०२१: देशभरात राबविण्यात येत असलेल्या कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाच्या २३ व्या दिवशी काल ५८ लाखांहून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी आणि आघाडीच्या योद्ध्याचे लसीकरण झाले. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत आता कोविड-१९ लसीकरण करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे.

आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मणिपूर, ओदिशा , राजस्थान, त्रिपुरा आणि उत्तराखंड या १२ राज्यांमध्ये काल लसीकरण कार्यक्रम झाला.

अहवालानुसार, कालपर्यंत (काल संध्याकाळी ६:४० वाजेपर्यंत) एकूण ५८,०३,६१७ आरोग्यसेवा कर्मचारी आणि आघाडीच्या योद्ध्याचे लसीकरण झाले. आतापर्यंत एकूण १,१६,४७८ सत्रे घेण्यात आली आहेत. काल संध्याकाळी ६:४० वाजेपर्यंत १,२९५ सत्रे घेण्यात आली. एकूण आकड्यापैकी ५३,१७,७६० आरोग्यसेवा कर्मचारी आहेत आणि ४,८५,८५७ आघाडीचे योद्धे आहेत.

काल सायंकाळी ६:४० पर्यंत २८,०५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यापैकी १२,९७८ आरोग्यसेवा कर्मचारी होते, तर इतर १५,०८१ लाभार्थी आघाडीचे योद्धे होते. विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेच्या तेविसाव्या दिवशी संध्याकाळी ६.४० पर्यंत कोणत्याही एईएफआयची (लसीकरणानंतर झालेला थोडा त्रास) नोंद झाली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा