आजपासून भारतात लस मॉक ड्रिल, जाणून घ्या कसे आणि कुठल्या राज्यात होणार

नवी दिल्ली, २८ डिसेंबर २०२०: ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. कोरोना लसीची भारतात देखील आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लस सुरू होण्यापूर्वी भारत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या तयारीत व्यस्त आहे. आजपासून ४८ तासांपर्यंत लसीची मोठी मॉक ड्रिल सुरू केली जात आहे.

भारतात कोरोना लसची काउंटडाउन सुरू होताच तयारीची गती अनेक पटींनी वाढली आहे. कोरोना लसीकरण माइक्रो प्लान तयार आहे. सरकारी अधिकारी आणि मोहिमांशी संबंधित संपूर्ण चक्र जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची तयारी करीत आहे.

केंद्र सरकार पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. म्हणजेच लस कार्यक्रम सुरू करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी घेतली जाईल.

मॉक ड्रिलमध्ये काय होईल?

हे एक अशी मोहीम आहे ज्यामध्ये वास्तविक कोणतीही लस दिली जाणार नाही मात्र लस देण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे ती संपूर्ण प्रक्रिया या मोहिमेदरम्यान राबवली जाईल. अर्थात त्याची रंगीत तालीम घेतली जाईल. या सराव मध्ये लस पुरवठा, चाचणी पावत्या आणि आवश्यक डेटा समाविष्ट करणे, लस प्रक्रियेमध्ये सामील असलेल्या टीम सदस्यांची तैनाती करणे, एकमेकांमधील अंतर तपासणी करणे, कोल्ड स्टोरेजची चाचणी समाविष्ट आहे.

या पद्धतीद्वारे, लसीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल हे समजून घेण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.

मॉक ड्रिल कोठे असेल?

जिल्हा रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, खाजगी रुग्णालये येथे ही कवायत घेण्यात येईल. म्हणजेच, या मॉक ड्रिलचा परिणाम पुढील संपूर्ण लसीकरण योजनेच्या तयारीवर परिणाम करेल. या ड्रिलचा भाग बनणारी राज्ये त्याबद्दल खूप गंभीर आहेत.

सर्व राज्यांमध्ये लसीची साठवण, वितरण आणि लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. लसीची कोल्ड चेन कायम ठेवण्यासाठी डीप फ्रीझर व इतर माध्यमांची व्यवस्था केली जात आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी निवडलेल्या आरोग्य कामगारांना प्रशिक्षण दिले जात आहे.

विमानतळावर २.५ मिल्लियन लस ठेवण्याची क्षमता

दिल्ली विमानतळावर कोविड लशीची उपकरणे आल्यानंतर देखभाल व वाहतुकीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. या मेगा तयारीला प्रकल्प संजीवनी असे नाव देण्यात आले आहे. यासाठी विमानतळावरच मोठी थंड खोल्या किंवा कूलिंग चेंबर बनविण्यात आले आहेत.

उणे २० अंश तापमानात ही लस ठेवली जाईल. एकावेळी २७ लाख लस ठेवण्याची तरतूद आहे. अश्या ५४ लाख लसिंची हालचाल एका दिवसात शक्य आहे. दिल्ली विमानतळावर २.५ मिलियन लस ठेवण्याची क्षमता आहे. गरज भासल्यास ते किंचित वाढवताही येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा