मांडव न घालता मंदिरातच वाघेश्वर तरुण मंडळ गणेशोत्सव साजरा करणार

वाघोली, दि.१३ ऑगस्ट २०२०: कोरोना पार्श्वभूमीवर वाघोली येथील नावाजलेले व प्रसिद्ध वाघेश्वर तरुण मंडळ यांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यावर्षी मांडव न घालता मुख्य मंदिरातच गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव काळात सामाजिक उपक्रम राबवून यावर्षी प्राणप्रतिष्ठा व विसर्जन मिरवणूक देखील रद्द करण्यात आल्या असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ रामभाऊ दाभाडे व अध्यक्ष चैतन्य सातव यांनी सांगितले. वाघोली मध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लहान-मोठ्या जवळपास ६० मंडळाचा सहभाग यामध्ये असतो या मंडळापैकी येथील वाघेश्वर तरुण मंडळाचा भव्य देखावा गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान केले आहे.

याच अनुषंगाने लोणीकंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी वाघेश्वर तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले असता पदाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन यावर्षी गणेश उत्सवात मांडव न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य गणेश मंदिरांमध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा व विसर्जन मिरवणूक देखील काढण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश उत्सव काळात सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून वाघोलीतील इतर गणेश मंडळांनी देखील साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान वाघेश्वर तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा