वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून ६०० किलो गोमांस पकडले

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील चौफुलीवर तालुका पोलिसांच्या पथकाने गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
१ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ६०० किलो गोमांसासह ५ लाख किंमतीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोणी ते नांदुर शिंगोटे रस्त्यावरून टेम्पोतून गोमांस वाहून नेले जात होते. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पोलिसांच्या पथकाने हा टेम्पो पकडला.
मोहम्मद अकबर अक्रम शेख (रा.कुर्ला ईस्ट, मुंबई २४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याचा साथीदार इरफान हा पसार झाला. पोलीस नाईक अनिल जाधव यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायदा १९९५ चे सुधारित कायदा कलमातील तरतुदीमुळे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा