वैदूवाडीसाठी स्वतंत्र पोलीस चौकी ची मागणी

पुणे: हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सोलापूर रस्त्यालगत वैदूवाडी हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. या परिसरात दलित, भटक्या जमाती, बहुजन, अल्पसंख्याक वर्गातील कष्टकरी समाजाची १० हजार लोकसंख्या आहे. अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी, दहशत, तडीपार गुन्हेगार, रोड रोमिओ, भुरट्या चोऱ्या करणारे चोर यामुळे या भागातील नागरी सुरक्षा ही धोक्यात आलेली आहे. महिलांची छेडछाड, लहानमुलींवर अत्याचार,
दहशतीकरिता नागरिकांना धमकावणे, मारहाण, रात्री अपरात्री लूटमार, दरोडे, वाहनांच्या नुकसानी, चोऱ्या या घटना सतत घडत असल्याने नागरिकांना
विशेषतः महिलांना जगणे नकोसे झाले आहे.

या भागातील स्थानिक समाज कंटक हे येथील सामाजीक सलोख्याचे वातावरण दूषित करण्यासाठी विविध गंभीर प्रकार करत असतात, यातून भीमा कोरेगाव सारखी घटना येथे घडू शकते.
त्यामुळे वैदूवाडी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करण्याची मागणी पुणे शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या शहरअध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी निवेदनाद्वारे पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

या निवेदनाची प्रत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनमधील उपपोलीस निरीक्षक मोहिनी डोंगरे यांना सादर केली यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. या निवेदनात शशिकला वाघमारे यांनी म्हटले आहे की नवीन पोलीस चौकीमुळे वैदूवाडी भागातील अनुचित प्रकारांना आळा बसून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.तसेच रात्रीची गस्त सुरू राहील, स्थानिक गुन्हेगाराना जरब बसेल,चोऱ्या,मारहाण,गुंडगिरी,छडछाड,
अत्याचार हे सारेच अपप्रकार थांबून वैदूवाडीतील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित जीवन जगता येणार आहे.

तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने आम्ही वैदू वाडीसाठी स्वतंत्र पोलीस चौकी मंजूर करण्याची मागणी केली आहे अशी माहिती यावेळी वाघमारे यांनी दिली.
यावेळी संगीता ओव्हाळ, छाया बोरुडे,सरिता सोनवणे, भावना जगताप,संगीता जाड,सुनीता नाईकवाडे,रेश्मा मुल्ला,शीला कांबळे,सारिका वाघमारे,मुमताज अरब आदी आरपीआयच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा