गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पावसामुळे उपचारास उशीर, मुलीचा मृत्यू

पावसामुळे उपचारास उशीर, मुलीचा मृत्यू

शिऊर येथील वैष्णवी योगेश जाधव हिची अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओढ्याला आलेल्या पुरामुळे रुग्णालयाच्या रस्त्यावर अडथळे निर्माण झाले.

जवळपास १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी कुटुंबीयांना तब्बल २ तास लागले. या विलंबामुळे वैष्णवीचा दुर्दैवी अंत झाला.

विशेष म्हणजे, १० दिवसांपूर्वीच घरातील आजोबांचे निधन झाले होते. त्यानंतर एवढ्या अल्पावधीतच नातीचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी संजय आहिर

error: Content is protected !!
Exit mobile version