गोल पोस्ट जळगाव कर्जाणे आदिवासी संस्कृतीत गाव शिवार आराखडा ग्रामविकासाला नवे बळ

कर्जाणे आदिवासी संस्कृतीत गाव शिवार आराखडा ग्रामविकासाला नवे बळ

आज कर्जाणे गावात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. आदिवासी परंपरा आणि जीवनशैली जपत प्रथमच गाव शिवार आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा विकासासोबतच संस्कृतीचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

ग्रामसभेच्या सहभागातून तयार झालेल्या या आराखड्यात पारंपरिक देवस्थाने, पवित्र झाडे, पाणवठे, जत्रा-उत्सवाच्या जागा, शिकारी-संकलन क्षेत्रे तसेच आधुनिक शेती व जलसंधारण साधनांचा समन्वय साधण्यात आला. त्यामुळे गावात विकास आणि परंपरेचा सुंदर संगम साधला गेला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. पी. माहुरे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, यावल) होते. त्यांनी शिवार फेरीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. उपसरपंच प्रमोद बारेला यांनी “कर्मयोगी” या माध्यमातून गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा याबाबत मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात स्थानिक लोकनेते, आदिवासी समाजातील ज्येष्ठ मंडळी, युवक, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी “आमच्या संस्कृतीचे जतन करताच विकास शक्य आहे” असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनाने या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे आदिवासी संस्कृती आणि गावाच्या शाश्वत विकासाला नवी दिशा मिळेल, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्जाणे आश्रमशाळेचे प्राथमिक शिक्षक रामचंद्र आखाडे यांनी केले. तसेच ग्रामसेवक, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा ताई, बचत गटाच्या महिला, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, तसेच विद्यार्थी व शिक्षक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version