वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, सात दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र व दीर सुशील हगवणेला पुण्यातून अटक

Rajendra and Sushil Hagwane Arrested from Pune
सात दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र व दीर सुशील हगवणेला पुण्यातून अटक

Rajendra and Sushil Hagwane Arrested from Pune: मागच्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण चांगकलेच पेटून उठले आहे. यातच आता पिंपरी- पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून पहाटे अटक केली आहे.मागच्या सात दिवसांपासून बाप लेक फरार झाले होते.त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आठ पथके पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात होता त्यामुळे राजकारण चांगलाच तापल होत.अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसांपासून सासरा आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे पसार झाले होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना पुणे पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले असून त्यांना 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल दिवसभरात राजकीय नेत्यांनी कास्पटे कुटुंबियांची भेट घेऊन संतांवण केले. आरोपी राजेंद्र आणि सुशील यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी कास्पटे कुटुंबीयांना दिल होत. अखेर त्यांना स्वारगेट परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिस आयुक्त विनय चौबे या प्रकरणाचा करत होते तपास:

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सतत आपल लोकेशन बदलत होते. त्यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांनी आठ पथके तैनात केली होती. याशियाव पोलिस आयुक्त विनय चौबे स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या सूचना देत होते. ते सतत आपली जागा बदलत असल्याने त्यांना पकडणं अवघड जात होत.

न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर