कटरा (जम्मू काश्मीर),१६ ऑगस्ट २०२०: पाच महिन्यानंतर वैष्णोदेवी यात्रेला आज पहाटे ६ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे . सध्या भाविक खूप कमी असल्याने स्थानिक लोकच दर्शनासाठी जात आहेत. खासकरून ते भाविक जे महिना दोन महिन्याने येत असतात. कोरोनामुळे भाविकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे, तापमान मोजण्यासाठी मशीन ठेवण्यात आली आहे.
याआधी श्राइन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी भेट देऊन सर्व तयारीची पाहणी केली. यावर्षी पिट्ठू आणि खच्चर यांचा वापर करण्यात येणार नसल्याने सर्व भाविकांना १४ किमीची यात्रा पायी व मास्क लावून करावी लागणार आहे. भाविकांच्या हेल्थ टेस्टसाठी मेडिकल कॅम्प लावण्याचे सांगण्यात येत होते, परंतु अद्याप हि सेवा सुरू करण्यात आलेली नाही.
बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाच्या सूचना
– कोरोना टेस्ट करून रिपोर्ट बरोबर ठेवणे.
– मोबाईलमध्ये आरोग्य सेतु अँप ठेवणे.
– फेस मास्कचा वापर करणे.
– ऑनलाईन बुकिंग करू शकता.
– हॉटेल बुकिंग सुरु झाले आहेत ,ऑनलाईन हॉटेल बुकिंग करू शकता.
न्यूज अनकट प्रतिनिधी