वजन कमी करायचंय? मग नक्की वाचा!

आपण आपल्या संस्कृतीकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि, आपल्याकडे आयुर्वेदाला खूप महत्व आहे. आपल्याला लवकर फलित हवं असतं आणि त्या दृष्टीने आपण काही औषधं-गोळ्या घेतो आणि त्यातून वजन वाढायला सुरवात होते. जाणून घेऊ वाढत्या वजनावर उपाय:
 मनाने आहार घेण्याऐवजी आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आपल्या प्रत्येक मनुष्यांच्या शरीरामध्ये जठाराग्नी असतो. प्रत्येक व्यक्तीने आपल्या भुकेनुसार अन्नग्रहण करावे.
  जेव्हा भूक लागेल, तेव्हा खावे. जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी जरूर प्यावे. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन झाले की ते अंगी लागते आणि योग्य व्यायाम केला तर शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही. त्यामुळे चयापचयजन्य मधुमेहासारखे आजार होत नाही.
   काय नि किती खावे?
  वजन कमी करण्यासाठी मध घेताना, पाणी हे एक अष्टमांश उकळवावे. म्हणजे चार कप पाणी अर्धा कप राहील एवढे उकळवावे. ते कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध घालावा आणि असे पाणी सकाळी- सूर्योदयापूर्वी घ्यावे.
   सकाळी प्रातर्विधी आटोपल्यावर व्यायाम झाल्यावर भुकेनुसार पचण्यास हलका नाश्ता करावा. त्यात तुम्ही मऊ भात, सांजा, तांदळाचे घावने खाऊ शकता. जेवणामध्ये दोन चमचे साजुक तूप ग्रहण करावे.
  थालीपीठ, मोकळ भाजणी, तांदूळ भाजून केलेला भात, सोजी, मुगाची खिचडी असा आहार रात्री जेवणात घ्यावा.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा